

मोहोळ : मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी सिना नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिना नदीतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने पंपिंग बंद पडण्याची वेळ आली असून, नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
सध्या नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने येत्या काही दिवसांत शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच हा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने नगर परिषद व पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांकडून तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था, टँकरची संख्या वाढवणे तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. अन्यथा मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल,