Solapur Illegal liquor: टाकळी सिकंदरमध्ये अवैध दारू विक्रीवर छापा

लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त, दोघांवर गुन्हा
illegal liquor seized
illegal liquor seizedpudhari photo
Published on
Updated on

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १ लाख ५८० रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संकेत संतोष सोनटक्के (वय २२, रा. शामनगर, सिकंदर टाकळी, ता. मोहोळ), स्वप्निल उर्फ मुन्ना भीमराव वसेकर (रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

टाकळी सिकंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात संकेत सोनटक्के हा आपल्या राहत्या घराशेजारील पत्राशेडमध्ये अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. एकूण १ लाख ५८० रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. संकेत सोनटक्के याने हा मद्यसाठा स्वप्निल वसेकर याच्याकडून आणल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोहोळ तालुक्यात अवैध दारूविक्री विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे बेकायदा धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news