

पोखरापूर : मोहोळ नगरपरिषदेला मंजूर असलेल्या अग्निशमन केंद्र व वाहनाला तात्काळ निधी मिळण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्याकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या जीआरला अनुसरून कार्यवाही करावी, असा शेरा उपमुख्यमंत्र्यांनी पत्रावर दिला असून यामुळे मोहोळ नगरपरिषदेला अग्निशामक वाहन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच मोहोळ नगरपरिषदेला मंजूर अग्निशमन केंद्र व वाहनासाठी तात्काळ निधी मिळण्याची मागणी केली.