Solapur Crime: मोहोळमध्ये भरदिवसा 7 लाखांचा मुद्देमाल लंपास

7 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सोने, चांदी मुद्देमालासह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवार दि.24 मार्च रोजी मोहोळ शहरातील क्रांतीनगर येथे भर दिवसा घडली
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पोखरापूर : बंद घराच्या खिडकीमधून प्रवेश करीत 7 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सोने, चांदी मुद्देमालासह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवार दि.24 मार्च रोजी मोहोळ शहरातील क्रांतीनगर येथे भर दिवसा घडली .

शिवाजी सुलतान काकडे (रा. क्रांतीनगर मोहोळ) हे नेहमीप्रमाणे पत्नीसह शेतातील काम करुन सायंकाळी पाच वाजता घराकडे परतले होते. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.सदर घरामध्ये पाहणी केली असता 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे दिड तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र,1 लाख 50 हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची पिवळ्या खड्याची अंगठी, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची फूले झुबे,75 हजार रुपये किमतीचे आर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, 75 हजार रुपये किमतीचे आर्धा तोळे वजनाची सोन्याच्या 5 अंगठी, 5 हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे चांदीचे फुलपात्र, रोख रक्कम 22 हजार रुपये असा एकूण 7 लाख 2 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी शिवाजी सुलतान काकडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news