

सोलापूर : शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कारखान्याचे चेअरमन पद रद्द व्हावे, यासाठी बुधवारी (दि. 29) दुसरी सुनावणी झाली. मात्र, त्यामध्ये कोणताही निर्णय न होता ती सुनावणी पुढे गेली आहे. आता सहा फेब्रुवारीला सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटप गैरप्रकारात कलम 88 नुसार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोषी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सहकार कायद्यानुसार चेअरमन पद रद्द करावे, यासाठी साखर सहसंचालक कार्यालयात सुनावणी सुरू आहे. ती सुनावणी पुढे गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सहकार कायदा 1960 व नियम 1961 यानुसार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी सहा फेब्रुवारीच्या आतमध्ये राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांचे चेअरमन पद काढण्यात येईल, असा दावा विरोधक करत आहेत.