

सोलापूर : कन्नड शाळांमध्ये कन्नड माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमध्ये आवश्यक बदल करावे, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी शिक्षक समिती कन्नड संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव यांनी ग्रामविकास मंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली आहे. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थित होते.
आ. कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक समिती कन्नड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरव यांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, विज्ञान व भाषा विषय शिक्षकांना सर्व सकट वेतनश्रेणी द्यावे, कन्नड शाळांमध्ये कन्नड माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात पवित्र पोर्टलमध्ये आवश्यक बदल करावे, अशा विविध मागण्या पूर्ण कराव्या, अशी विनंती केली.