

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील आमदार सुभाष देशमुख यांचे फलक उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी फोडले आहे. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चा संघटनने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन केले आहे.
उपसरपंच पाटोळे यांनी आठ दिवसापूर्वी आरोग्य उपकेंद्र बंद ठेवले होते. तसेच काही दिवसानंतर उपकेंद्रातील आ. देशमुखांसह इतर नावे असलेले फलक रात्री साडेदहाच्या सुमारास तोडून काढले. त्यामुळे त्यांच्यासह इतर दोषी असणारे पदाधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करावे. शासकीय मालमत्तेची तोडफोड करण्याचा अधिकार कुणालाही नाही. मात्र, उपसरपंच पाटोळे यांनी फलकाची तोडफोड केली आहे. अन्यथा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चा संघटनेचे पदाधिकार्यांनी सांगितले.