

सोलापूर : अल्पवयीन मातांच्या प्रकरणाने उडालेली खळबळ आता राज्यस्तरावर पोहोचली. महाराष्ट्र महिला व बाल हक्क आयोगाने या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे. गुरुवारी (दि. 23) प्रकरणाची सुनावणी आयोगासमोर होणार असून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या 84 प्रकरणांपैकी तब्बल 34 माता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे 15 प्रकरणांची माहिती महापालिकेकडून पोलिसांना कळविण्यातच आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.