Solapur Crime news: अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून निकाह

वकिलासह पाच जणांवर गुन्हा, तिघांना अटक
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

सोलापूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आमिष दाखवत तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला. या प्रकरणात वकिलासह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेच्या फिर्यादीवरून इसराईल शेख, त्याचा मित्र उजेब उर्फ म. हनीफ सादिक शेख, धर्मांतराचा सल्ला देणारा वकील अब्दुल्लाह सलीम खतीब, तसेच फिरोज व त्याची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. दत्तूसिंग पवार काम पाहत आहेत.

पीडितेचे वडील रिक्षा चालक आहेत. पीडिता दहावीत शिकत असताना, 2023 मध्ये इसराईल शेख हा तिचा पाठलाग करणे, शाळेपर्यंत मागे जाणे असे प्रकार करू लागला. डिसेंबर 2024 मध्ये मित्र उजेबच्या घरी नेऊन इसराईलने पीडितेवर अत्याचार केला. संशय आल्याने वडिलांनी चौकशी केली असता पीडितेने संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबाने घर बदलले. नंतर पीडितेने जेईई परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. परंतु पुन्हा वर्गातील एका विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरून दोघांचे संभाषण सुरू झाले. सप्टेंबर 2025 मध्ये उजेबच्या मदतीने पुन्हा अत्याचार करण्यात आला.

डिसेंबर 2025 मध्ये कॉलेज सुटल्यानंतर इसराईलने पीडितेला शहर काझी कार्यालयात नेले. तेथे वकील अब्दुल्लाह खतीबने, धर्मांतर केल्याशिवाय विवाह कायदेशीर ठरणार नाही, असे सांगितले. त्यानंतर स्टॅम्पवर मजकूर टाईप करून पीडितेकडून जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेण्यात आली. तिचे नाव आयेशा शेख ठेवून निकाह लावण्यात आला. त्यानंतर एक महिना सोलापुरात राहू नका, असा सल्ला देत पीडितेला कलबुर्गीला नेण्यात आले, असे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news