MBA entrance exam: एमबीए प्रवेश परीक्षेसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वाची मुदतवाढ जाहीर केली
MBA admissions
MBA admissionsFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वाची मुदतवाढ जाहीर केली आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दि.20 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे.

अनेक उमेदवारांच्या शैक्षणिक आवडी आणि गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अर्जाची प्रक्रिया 10 जानेवारी रोजी सुरू झाली होती आणि त्याची मूळ अंतिम दि. 12 फेब्रुवारी होती. मात्र, आता दि. 13 ते दि.20 फेब्रुवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे नोंदणी राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना आपले अर्ज निश्चित करता येतील. राज्यातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून, इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तात्पुरती तारीख अशी असणार

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने 2026 या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एमएचटी-सीईटी पीसीएम/पीसीबी अभ्यासक्रमासाठी परीक्षेचा पहिला प्रयत्न दि. 11 ते 26 एप्रिल दरम्यान, तर दुसरा प्रयत्न दि.10 ते 17 मे या काळात होईल. तसेच, एमएएच- एमबीएचा पहिला प्रयत्न दि. 6 ते 8 एप्रिल आणि दुसरा प्रयत्न दि. 9 मे रोजी पार पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news