

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. मंगळवारी, दि. 25 पासून अर्जाची विक्री आणि स्वीकृती सुरुवात होणार आहे. 27 एप्रिल रोजी मतदान, तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
सतरा संचालक मंडळासाठी बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील नेत्यांनी कंबर कसली असून, अडत व्यापारी, सोसायटी चेअरमन, हमाल, तोलार, ग्रामपंचायत सदस्यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न नेत्यांकडून होत आहे.
बाजार समितीची निवडणूक सुरू झाल्याने माजी आ. दिलीप माने यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, अडत व्यापार्यांची बैठक घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीची तयार सुरू केली आहे.
25 ते 28 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल
एक एप्रिल रोजी छाननी
दोन ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज माघारी
17 एप्रिल रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
27 एप्रिलला मतदान
28 एप्रिलला मतमोजणी
बाजार समितीच्या निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. शेतकर्यांना मतदानाचा अधिकार न दिल्याने तसेच निवडणूक प्रक्रियेत बदल केल्याने बाजार समितीची निवडणूक लढणार नाही. शेतकर्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने निवडणूक लढविण्याची इच्छा नाही.
- विजयकुमार देशमुख, आमदार