

सोलापूर : मरीआई चौक येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 डिसेंबरपासून वर्षभर बंद राहणार आहे.
उभारणी कामासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. यासाठी 9 डिसेंबर 2025 पासून पुढील वर्षाच्या 8 डिसेंबर 2026 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी जारी केला आहे. मंगळवेढा रोडकडून हैद्राबाद, तुळजापुर, विजापूर पुण्याकडे जाणारी वाहतुक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपास अशी होणार आहेत.
देगाव व दमाणी नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात येण्याजाण्यासाठी जगताप हॉस्पिटल, सी.एन.एस. हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा अभिमानश्री नगर, अरविंदधाम वसाहत, जुना पुना नाका हा मार्ग वापरतील.
मरीआई चौक ते एस.टी. स्टॅन्ड ः सर्व वाहने शेटेनगर रेल्वे बोगदा, खमीतकर अपार्टमेंट, एम.एस.ई.बी. ऑफिस, निराळे वस्ती, एस.टी.स्टॅन्ड ,मरीआई चौक, शेटेनगर ते छ. शिवाजी महाराज चौक अशी जातील व येतील.
सर्व वाहने मरीआई चौकापासून नागोबा मंदिर, रामवाडी, पोलिस चौकी, रामवाडी दवाखाना, मोदी बोगदा, जांबमुनी चौक, मोदी चौकी, कुमार चौक ते रेल्वे स्टेशन अशी जातील व येतील.