Maratha reservation: सोलापूरच्या आंदोलकांची रस्त्यांवर पंगत

मराठा वादळ : गणपती सजावटीतून जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा
Maratha reservation |
सोलापूर : मुंबईतील मराठा आंदोलनात सोलापुरातील सहभागी आंदोलकांनी रस्त्यांवर पंगत मांडली.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : मुंबईत आझाद मैदानावर मराठ्यांचे भगवे वादळ पोहचले आहे. या आंदोलनात सोलापुरातील हजारो मराठा बांधवही सहभागी झाले आहेत. सोलापूरच्या मराठा बांधवांनी सोबत घेऊन गेलेली शिदोरी मुंबईच्या रस्त्यांवर पंगत मांडून भोजन केले. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे, याचे विविध स्तरावर पडसादही उमटत आहेत. सोलापुरात मूर्तिकार नितीन जाधव परिवाराने घरातील गणपती समोर मुुंबई आंदोलनाचा देखावा उभा करत सजावटीच्या माध्यमातून जरांगेंच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावे आणि सग्या सोयर्‍यांचा जीआर काढण्यात यावा, अशा मागण्याकरिता राज्यातील मराठा समाजाने मुंबईत दाखल झाला आहे.मुंबई जाम झाली आहे. लाखो मराठे आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोलापूर शहर जिल्हातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळ, सांगोला अशा प्रत्येक तालुक्यातून जिल्हातून चार चाकी गाड्याचा ताफा घेऊन मुंबईत पोहचले आहेत. मुंबईत सर्वत्र भगवे वादळ निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्हातील सकल मराठा आणि क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी अनेक मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सोलापुरातील सहभागी आंदोलनकांनी घरातून घेऊन गेलेले कडक भाकरी, शेंगाची चटणी, ठेचा यावर मुंबईतील भर रस्त्यांवर पंगत मांडून भोजन करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांला नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे. मराठा समाजाचे समनव्यक राजन जाधव, तुकाराम मस्के यांच्या अनेक मराठा बांधव दिसत आहेत.

सजावटीतून आंदोलनास पाठिंबा

सोलापुराचे मूर्तिकार नितीन जाधव आणि अभिजली जाधव यांनी आपल्या घरात पर्यावणपुरक गणपती स्थापना केली आहे. बाप्पासमोर यंदा जाधव परिवारांनी मनोज जरांगे यांचे हातााने चित्र रेखाटून मुुंबईती जमा झालेले भगवे वादळ असे सजावट करून सजावटीच्या माध्यामातून जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news