Elections
ElectionsPudhari

Mangalwedha ZP Election : जि. प. गटासाठी 94 तर पं. स. गणासाठी 113 अर्ज विक्री

सोमवारी पंचायत समितीसाठी तीन अर्ज दाखल : अनेक जण थांबा व पहाच्या भूमिकेत
Published on

मंगळवेढा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्यामध्ये जोरदार प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. 207 इतके नामनिर्देशन पत्र घेतले गेले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद व 8 पंचायती समितीच्या जागेवर होणाऱ्या निवडणुकीसाठी तालुक्यातून मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोणत्याही पक्षाने अथवा कोणत्याही आघाडीने आपले पत्ते ओपन केले नसल्याने संभाव्य नावे चर्चेत आहेत. याबाबत अधिकृत दुजोरा कोणत्याही गटाने दिला नाही. मंगळवेढा तालुक्यामध्ये भालके परिचारक व आ. आवताडे यांची राजकीय ताकद मोठी आहे. या तीन गटातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक लढवणारे इच्छुक जास्त असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांना बैठका घेऊन पुढे कोणतीही दिशा सापडत नसल्याने सध्या त्यांनी आपले समर्थक भालके, परिचारक, आ. आवताडे यांच्या गटात निवडणुकीला उभे राहतील का? याबाबतची चाचपणी करत आहेत. सध्या चेअरमन शिवानंद पाटील यांनी दामाजी नगर जिल्हा परिषद गटासाठी लढावे, अशी त्या भागातील लोकांनी मागणी केली. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी द्यायची, या भूमिकेने निवडणूक लढवणार नाही. हा निर्णय घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, बुधवारी शेवटचा दिवस असल्याने अनेक नामनिर्देशन पत्रे दाखल होतील, अशी शक्यता आहे. संत दामाजी नगर ओबीसी पुरुष, हुलजंती सर्वसाधारण महिला प्रवर्ग, भोसे खुला प्रवर्ग तर लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अनेक जिल्हा परिषद गटात बाहेरच्या गटातील उमेदवारांची संभाव्य नावे चर्चेत आल्याने त्या गटातील लोकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भालके, परिचारक व आवताडे गटाला याबाबत विचार करावा लागणार आहे. मंगळवेढ्यात शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत खुल्या प्रवर्गात सर्वसाधारण जागेवर जे आरक्षण आहे. त्या आरक्षणाच्या विचारानेच उमेदवार द्यावेत, असा बैठकीत सूर उमटल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news