Solapur marriage fraud: मंगळवेढ्यात नवरी नटली अन्‌‍ फसवून पळाली

नवरदेवाला पावणेतीन लाखांचा गंडा, मुस्लिम तरुणीला मराठा भासवून उरकले लग्न, एजंट महिलेसह नववधूवर गुन्हा दाखल
marriage fraud
marriage fraudfile photo
Published on
Updated on

मंगळवेढा : मुलगी मुस्लिम असूनही मराठा असल्याचे भासवून, पहिले लग्न झाले असतानाही ती अविवाहित असल्याचे सांगून 37 वर्षीय शेतकरी नवरदेवाची फसवणूक करत त्यास दोन लाख 70 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार मंगळवेढ्यात उघडकीस आला.

याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी सुरेखा सूर्यवंशी (रा. उदगीर, जि. लातूर), नववधू कुसुमबेन बेमाबाई घाटाड (वय 25, रा. वामी, ता. थरात, जि. बनासकांठा, गुजरात), नजमा खासीम मोमीन उर्फ नजमा जहूर अहमद जाफरी (39, रा. उदगीर, जि. लातूर), सादिया अमजद शेख (20, रा. थरात, जि. बनासकांठा) यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची माहिती अशी : लेंडवे चिंचाळे येथील विनायक भीमराव आवताडे (वय 37) या शेतकऱ्याची ओळख उदगीर येथील एजंट सुरेखा सूर्यवंशी हिच्याशी झाली. 16 एप्रिल रोजी विनायक यांना उदगीर येथे बोलावण्यात आले. तेथे कुसुम नावाची मुलगी दाखवण्यात आली. ती मराठा समाजाची असल्याचे एजंटने भासवले. त्यानंतर एजंटने लग्नासाठी दोन लाख 70 हजारांची मागणी केली. विनायक यांनी 2 लाख 50 हजार रोख आणि 20 हजार रुपये फोन पेद्वारे दिले. पैसे मिळताच त्याच रात्री 11 वाजता एका गणपती मंदिरात हार घालून लग्न उरकण्यात आले. त्यानंतर विनायक पत्नीला घेऊन गावी आले. घरी पुन्हा रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावून आईचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पत्नीला घालण्यास दिले.

दि. 23 एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास कुसुम कोणालाही न सांगता घरामागे आलेल्या चारचाकी (एमएच 08 झेड 7196) मधून पळून गेली. गावातील तरुणाने हा प्रकार विनायक यांच्या निदर्शनास आणून दिला. विनायक यांनी तातडीने पाठलाग करून मंगळवेढ्यातील आवताडे पेट्रोल पंपाजवळ ती गाडी पकडली. गाडी पकडल्यानंतर चौकशी केली असता, विनायक यांना मोठा धक्का बसला. संबंधित महिला ही गुजरातची असून, तिचे नाव कुसुमबेन घाटाड आहे. ती मुस्लिम असून, तिला पहिल्या लग्नानंतर मुलेही आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news