

भंडारकवठे : भंडारकवठे ते मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) रस्त्यावर इंदिरा नगर व सुतार गल्लीजवळ जीव घेणे दोन खड्डे पडले होते. ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीनेही बरेच दिवस बुजवण्यात आले नव्हते. याविषयी दै. ‘पुढारी’तून वृत्त प्रसिद्ध करताच मंद्रुप ग्रामपंचायतीने खड्डे बुजविले. त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भंडारकवठे रस्त्यावरील इंदिरा नगर व सुतार गल्ली अशा दोन ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले होते. यामुळे सतत दुचाकीसह सर्वच प्रकारच्या वहानांचे अपघात घडत होते. यातून अनेकजण जखमी झालेे आहेत. वाहनचालकांनी वारंवार पाठपुरावा करुनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. दै. पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल ग्रामंपचायतीने घेतली. व दोन्ही ठिकाणचे खड्डे बुजवले. यापुढील काळात अपघाती घटना टळणार असल्याने भंडारकवठेसह विंचूर, कुसूर, तेलगाव-भीमा, सादेपूर, बाळगी, निंबर्गी यासह अन्य गावातील नागरिकांसह वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.