‌Vande Bharat Express: ‘वंदे भारत‌’मध्ये साप सोडणाऱ्याला कोठडी

‌‘वंदे भारत‌’ एक्स्प्रेसमध्ये धामण जातीचा साप सोडणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी मुंबईत अटक केली
‌Vande Bharat Express: ‘वंदे भारत‌’मध्ये साप सोडणाऱ्याला कोठडी
Published on
Updated on

सोलापूर : वेगवान व सुरक्षित प्रवास करता येणारी म्हणून वंदे भारत या गाडीची ओळख आहे. याच एक्स्प्रेसमध्ये धामण जातीचा साप सोडणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी मुंबईत अटक केली. जगन भोले (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.

ही घटना मागील डिसेंबर महिन्यातील शनिवार (दि. 27) रोजी घडली होती. जगन याने अडीच फूट लांबीचा धामण जातीचा साप ठाणे स्टेशनमध्ये वंदे भारत या गाडीत सोडला होता. वंदे भारत सोलापुरात आल्यावर सापाला पकडण्यात आला. संबंधित तरूणाला रेल्वेच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गाडी क्रमांक 22225 या वंदे भारत एक्स्प्रेसच्या सी-16 कोचमधील स्वच्छतागृहात धामण जातीचा साप आढळला होता. हा साप वंदे भारतमध्ये कसा पोचला, याचा तपास करण्यासाठी गाडीतील सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासण्यात आले. यात जगन भोले हा तरूण ठाणे स्थानकात गाडीत साप सोडत असतानाचे स्पष्टपणे दिसले. पुढे कर्जत स्थानकात प्रवाशांना स्वच्छतागृहात हा साप दिसून आला. पण नंतर साप आढळला नाही. पुढे पुणे स्थानकातही साप शोधला. तेथेही हा साप मिळला नाही. सोलापूर येथील स्थानकावर गाडी पोहोचताच सर्पमित्राची मदत घेण्यात आली. त्यांनी या सापाला पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news