Solapur News : कचरा टाकण्याच्या ठिकाणी आढळले पुरुष जातीचे अर्भक

उपचारानंतर अर्भक सुस्थितीत; आरोपीचा शोध सुरू
Solapur News  |
प्रातिनिधीक फोटो.Pudhari File Photo
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील चिखली गावात बुधवारी पुरुष जातीचे एक अर्भक अडगळीच्या ठिकाणी कचरा टाकण्याच्या ठिकाणी सापडल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ त्याला मोहोळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून सध्या तरी अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे.

मोहोळ तालुक्यातील चिखली गावात एका किराणा दुकानाच्या जवळील बोळात अडगळीच्या ठिकाणी एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचे अर्भक असल्याचे नागरिकांना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दिसले. त्यांनी तत्काळ मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ त्याला मोहोळ येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले.

मोहोळ येथील खासगी रुग्णालयात त्या अर्भकाला दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले असून सदर अर्भक सुस्थितीत आहे. यासंदर्भात संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार तूर्तास अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येत असून, अर्भकास टाकून देणार्‍या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
- हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news