Pandharpur Vitthal Rukmini Temple |मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची मनमोहक आरास; पहाटेपासून महिलांची गर्दी

Pandharpur Vitthal Rukmini Temple | पंढरपुरात मकरसंक्रांत उत्साहात; रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला भाविक
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Published on
Updated on

पंढरपूर : सुरेश गायकवाड

मकरसंक्रांत सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पहाटे पासून मोठ्या प्रमाणात महिला भाविकांची गर्दी झाली आहे. येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे. यासाठी मंदिर समितीकडून भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आल्याने रुक्मिणी मातेचा वानवसा घेण्यासाठी आलेल्या महिला भाविकांना मनमोहक रूप दिसून येत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Pandharpur Vitthal Rukmini Temple
Crime News: "मम्मीने अंकलसोबत मिळून पापांना विष पाजलं..." चिमुरडीच्या साक्षीनं प्रियकर-प्रेयसी ठरले दोषी

आज बुधवारी मकरसंक्रांत निमित्त श्री रूक्मिणी मातेला पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. त्यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरकट्टा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकाराचा समावेश आहे.

त्याप्रमाणे मकरसंक्रांती सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग सजावटीने आकर्षक व मनमोहक दिसत आहे.

Pandharpur Vitthal Rukmini Temple
Makar Sankranti: मकर संक्रांतीचा सांगावा

सदरची सजावट अमोल शेरे, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे. त्यासाठी 2000 शेवंती, 100 गुलाब गड्डी, बेंगलोर शेवंती 10, ऑर्किड 10, ग्रीनरी 30, कामिनी 300, भगवा झेंडू 100 किलो, पिवळा झेंडू 100 किलो व पांढरी शेवंती 50 किलो इत्यादीचा वापर केला आहे. या सजावटीसाठी सुमारे 50 कामगारांनी परिश्रम घेतले.

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच महिला भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी विचारात घेऊन, सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच थेट दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे, महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

पहाटे पासून गर्दी....

श्री रुक्मिणी मातेला सुवासिनी महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली असून, हजारो महिला भाविक पहाटेपासूनच ताटात हळद, कुंकू, तिळगुळ, ऊस, बोर, गाजर, हुरडा यासह अन्य प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी मंदिरात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news