

सोलापूर : जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. बसवकल्याणच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या कमानीच्या प्रतिकृतीचे काम पूर्ण झाले आहे. दुुसर्या टप्प्यातील कामास सुरुवात केली आहे. यामध्ये नवीन चबुुतरा बांधणे, वॉलकंपाऊंड, शोभेची झाडे, एलईडीलाईट या कामांचा सामावेश आहे. सहा महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौदर्यांमध्ये भर पडणार आहे.
जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 1985 साली श्री काशी जगद्गुरु डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते, तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सुशिलकुमार शिंदे, महापौर बंडप्पा मुनाळे यांच्या उपस्थितीत झाले होते. सदर पुतळ्यास 40 वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे पुतळ्याचे नूतनीकरण व परिसर सुशोभिकरण करणे अत्यावश्यक होते. त्याकरिता आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका मूलभूत सोयी सुविधा योजेनेतून 25 लाखांचा निधी दिला होता.
गायत्री कंन्ट्रक्शनच्या वतीने पुुतळ्याच्या पाठिमागे बसवकल्याण गावातील प्रवेशव्दारांची प्रतीकृती सकारण्यात आली आहे. सुशोभीकरणाचा दुुसर्या टप्प्याचे काम चालू केले आहे. यासाठी उपमुुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलभुतसोई सुविधा योजनेतून 40 लाखांचा निधी दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी हा निधी मिळवला आहे.
महापालिकेच्या नगरअभियंता कार्यालयाकडून या कामांचा मक्ता सुनिल बेत यांना दिला आहे. या निधीतून पुतळ्याचा चबुतरा नवीन करणे, वॉल कंपाऊ उंची कमी करून ग्रील लावणे, अंतर्गत भागात शोभेची झाडे, एलईडी लाईट लावणे या काामंचा समावेश आहे. 23 जानेवारी 2024 रोजी वर्क ऑडर देण्यात आली आहे. मक्तेदारांकडून काम चालू केले आहे. सहा महिन्यात काम पुर्ण केले जाणार आहे. त्यासाठी पुतळा हालवण्यात आला आहे.