Women rescue team Maharashtra : महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात तयार

आपत्ती व्यवस्थापनात महिलांचा नवा आत्मविश्वास
Women rescue team Maharashtra |
सोलापूर : आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेताना महिला प्रशिक्षणार्थी.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे.

पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा वेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात. ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये आपत्तीची ओळख, (उझठ), स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण, प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे. प्रशिक्षण विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या आपदा सखींना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट देण्यात येणार आहे.

या महिलांनी घेतला प्रशिक्षणात सहभाग

रेखा राठोड, ऊर्मिला पवार, अरुणा राठोड, रूपाली दोरकर, दुर्गा बनसोडे, जयश्री भिसे, शुभांगी गवते, नागोबाई बिराजदार, चैताली सावंत, लावण्या गुंडला, सोनिया चौगुले, राजश्री दोरनहळ्ळी, आसमा शेख, पूजा जगताप, सुवर्णा गायकवाड या महिलांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे.

बचाव कार्यात प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. महिलांचा बचाव करताना महिलाच पुढे आल्या तर कार्य अधिक प्रभावी होते. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही गरज ओळखून महिला रेस्क्यू टीम तयार केली आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- शक्तिसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news