Student Aadhaar Verification : राज्‍यात दोन कोटी विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; शाळांचे पाऊल डिजिटलकडे

विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्तीसह इतर योजनांचा लाभ थेट मिळणार
Student Aadhaar Verification : राज्‍यात दोन कोटी विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण; शाळांचे पाऊल डिजिटलकडे
Published on: 
Updated on: 
अमोल साळुंके

सोलापूर : राज्‍यातील शाळांचे पाऊल डिजिटलच्‍या दिशेने जात आहे. राज्‍यातील शाळेतील दोन कोटी दोन लाख १५ हजार ७१२ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्‍यामुळे त्‍या विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्तीसह इतर योजनांचा लाभ थेट मिळणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध सोयी-सुविधा, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सवलतींचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी, तसेच शाळांमधील अचूक पटसंख्या व संचमान्यता निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली यू-डायस प्रणालीतील आधार प्रमाणीकरण प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९५.२३ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्‍यांचे आधार प्रमाणीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

संचमान्यतेला मिळणार अचूकता

शाळांमध्ये बनावट पटसंख्या दाखवून शासकीय निधी उठवण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी आणि प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनुसारच शिक्षक पदे (संचमान्यता) मंजूर करण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

राज्‍यातील ९५ टक्‍के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्‍यामुळे शासनाच्‍या विविध योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना थेट देता येणार आहे. तसेच शाळेतील अचूक पटसंख्या कळणार असून, त्‍याचा फायदा संचमान्‍यतेसाठी होणार आहे.
- राम शिंदे, जिल्‍हाध्यक्ष, जुनी पेन्‍शन संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news