Maharashtra Tree Day | जिल्ह्यात चार तर राज्यात दहा प्रकारचे मान्यताप्राप्त वृक्ष

राज्यात 12 जून हा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिन म्हणून साजरा
Maharashtra Tree Day |
Maharashtra Tree Day | जिल्ह्यात चार तर राज्यात दहा प्रकारचे मान्यताप्राप्त वृक्षFile Photo
Published on
Updated on
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : शहर-जिल्ह्यात प्रामुख्याने शासनाच्या वन विभागाकडून मान्यता मिळवलेले चार प्रकारचे वृक्ष आढळतात. यात नीमसारख्या औषधी वृक्षाचाही समावेश आहे. राज्यात या विभागाने मान्य केलेले विविध 10 प्रकारचे वृक्ष आहेत. म्हणूनच राज्यात 12 जून हा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रामुख्याने सोलापूर हा जिल्हा शुष्क व अर्ध-शुष्क भागात आहे. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थितीसह जलवायू यामुळे येथील वनस्पतीचे प्रकार हे शुष्क सहनशील असतात. येथील वनक्षेत्रात वाळवंटी, समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधीय वनस्पती अधिक आढळून येतात. राज्यात कोकम, अशोक, तळवडी, वड, झडी विंचू, पिऊ यासह अन्य 10 प्रकारचे वृक्ष आहेत.

बाभूळ : बाभूळ हा शुष्क परिस्थितीला अनुकूल वृक्ष आहे. याचे लाकूड मजबूत व टिकाऊ असते. जलाशयाच्या काठावर बांधकामासाठी वापरले जाते. याची मुळे खोल जात असल्याने कमी पाण्यावरसुध्दा ती तग धरणारी आहे.

नीम : नीमच्या झाड्याच्या पानापासून औषध तयार केले जाते. याचा उपयोग आरोग्यविषयक बाबतीत अधिक होतो. याची झाडे रस्त्याच्या कडेला व शेतात आढळतात.

कडुनिंब : मोठ्या प्रमाणात उगवणारा वृक्ष म्हणून याकडे पाहिले जाते. याचे फुल गंधाळ दिसायला सुंदर असते. शिवाय याला बहुगुणी झाड म्हणूनही ओळखले जाते. याचा वापर साबण किंवा अन्य औद्यौगिकी-करणासाठी अधिक होतो.

चिंच : हे फळ झाडापैकी एक आहे. याचा वापर हा मसाला व चटणीत केला जातो. शेतकर्‍यांना उत्पन्न देणारा व संवर्धनासाठी खर्च नसलेला वृक्ष म्हणूनही शेतकरी याचा सांभाळ करतात. चिंच ही जैवविविधता व पर्यावरणीय महत्त्व वाढवणारी आहे.

येथे अनेक फुलांसह फळझाडेही आहेत. येथील वातावरणाला अनुकूल, तग धरणारी वृक्षांची संख्या अधिक आहे. शिवाय पळस, बनियान, अंजीर हे वृक्षही आहेतच.

हे वृक्ष आहेत

भावा, इंग्रज चिंच, कवठ, बांबू, बेहडा, बकुळ, मेडशेंगी, जांभूळ, सीताफळ, सावर, शिंदी, अंजन, बोकर व तुती आदी प्रकारच्या प्रजातींचे वृक्ष जिल्ह्यात आढळतात.

जिल्ह्यात पारंपरिक वृक्ष तर आहेतच. शिवाय आवळा, हिरडा, बेहडा असे औषधी वृक्षही येथे आहेत. तसेच जंगली काटेरीसह कोरडे पानझडी वृक्षांचाही हा जिल्हा आहे. पर्यावरणीय अनुकूल असलेले वृक्ष आहेत. पण, त्यांची संख्या अपेक्षित नाही.
- रोहितकुमार गांगुर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news