Tourism Business Loan : पर्यटन क्षेत्रातील उद्योगासाठी १५ लाखांपर्यंत कर्ज

महिलांना 'आई ' योजनेतून मि‍ळणार व्याज परताव्याचाही लाभ
Loan
LoanPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : राज्यातील महिलांना पर्यटन क्षेत्रात उद्योजक बनवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य शासनाची आई योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना उद्योजक होता येणार आहे. त्‍यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करता यावा, यासाठी ५० हजार ते १५ लाखाचे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

या योजनेच्या कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा शासन देणार आहे. कर्ज परतफेड मुदत सात वर्षांपर्यंत आहे. कर्जमर्यादा ही किमान ५० हजार ते १५ लाखापर्यंत आहे. त्यामुळे पात्र महिलांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत मिळू शकते. होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, पर्यटन मार्गदर्शक सेवा आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा अशा पर्यटनाशी संबंधित व्यवसायांचा योजनेत समावेश आहे. अर्जदार महिला राज्यातील रहिवासी असणे व व्यवसायाची नोंदणी असणे अनिवार्य आहे. व्यवसायाच्या मालकीसह महिला कर्मचारी व अन्‍य पात्रतेचे निकष लागू आहेत.

आई योजनेची वैशिष्ट्ये

l कर्ज मर्यादा : ५० हजार ते १५ लाख रुपये

l व्याज परतावा : १२ टक्क्यांपर्यंत

l कालावधी : कमाल सात वर्षे

l परताव्याची मर्यादा : ४.५० लाख रुपये

l व्यवसाय : हॉटेल, होमस्टे, पर्यटन सेवा

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक खात्याचा तपशील, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रकल्प अहवाल अशी कागदपत्रे आवश्यक ठरू शकतात. इच्छुक महिलांनी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित पर्यटन कार्यालयात योजनेच्या अटी, पात्रता आणि कागदपत्रांची खात्री करून घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news