Solapur News : शासनाच्या तिजोरीवर ९६० कोटींचा अधिक भार

शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावाला गती; ​शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव
Solapur News : शासनाच्या तिजोरीवर ९६० कोटींचा अधिक भार
Published on: 
Updated on: 
अमोल साळुंके

​सोलापूर : राज्यातील शिक्षणसेवकांच्या मानधनात प्रतिमाह २० हजार रुपयांची वाढ करण्याच्या मागणीला प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने या संदर्भातील प्रस्ताव पुढील निर्णय व मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर केले. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास शासनाच्या तिजोरीवर अंदाजे वार्षिक ९६० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत शिक्षणसेवक अध्यापनासह परीक्षा, मूल्यमापन आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या शिक्षण सेवकांच्‍या मानधनात वाढ करावी, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेने केली आहे.

२२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या उच्चस्तरीय बैठकीतील भूमिका आणि ९ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाचा आधार घेत मानधनात तातडीने वाढ करावी, अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे. या प्रस्तावास वित्त व सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी मिळवून देण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महागाईमुळे कोलमडले आर्थिक गणित

वाढती महागाई, घरभाडे आणि प्रवास खर्चाच्या तुलनेत सध्याचे मानधन अत्यंत तुटपुंजे असल्याने शिक्षण सेवकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानधन कमी असल्‍याने आर्थिक गणित कोलमडत असल्‍याने वीस हजार रुपये मानधनात वाढ करण्याची मागणी शिक्षण सेवकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.