Maharashtra Livestock Census : राज्यात गायी १७.७, तर म्हशींची संख्या २१ टक्क्यांनी घटली

वाढता चारा खर्च, पाणीटंचाई, पशुखाद्याचे दर आणि पशुपालनाचा वाढता आर्थिक भार यामुळे राज्यातील पशुधनाच्या संख्येत मोठी घट
Maharashtra Livestock Census
Maharashtra Livestock Census
Published on: 
Updated on: 
संगमेश जेऊरे

सोलापूर : वाढता चारा खर्च, पाणीटंचाई, पशुखाद्याचे दर आणि पशुपालनाचा वाढता आर्थिक भार यामुळे राज्यातील पशुधनाच्या संख्येत मोठी घट झाल्याचे २१ व्या पशुगणनेच्या प्राथमिक आकडेवारीतून समोर आले आहे. २० व्या पशुगणनेच्या तुलनेत राज्यात गायींची संख्या १७.७ टक्के, म्हशींची २१ टक्के, तर शेळ्यांची संख्या १४.५ टक्क्यांनी घटली आहे.

दुसरीकडे, मेंढ्यांच्या संख्येत ५.८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र वैरण विकास कार्यक्रम जाहीर केला असून, यातूनही आकडेवारी समोर आला आहे. त्यामुळे पशुपालनाच्या बदलत्या अर्थकारणाचा परिणाम पशुधनाच्या रचनेवर होत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाला महत्त्वाचे स्थान आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हैस, शेळी आणि मेंढीपालन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांतील अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती, हिरव्या व सुक्या चाऱ्याची वाढती किंमत, पशुखाद्याचा खर्च आणि पाण्याची उपलब्धता या समस्यांमुळे पशुपालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्याचा परिणाम मोठ्या पशुधनाच्या संगोपनावर होत असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येते.

मेंढीपालनाकडे वाढता कल

गाय, म्हशींच्या दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न आणि संगोपनाचा खर्च यांचा ताळमेळ बसविणे लहान पशुपालकांना कठीण होत आहे. त्यामुळे काही पशुपालक मोठ्या पशुधनाची संख्या कमी करण्याचा पर्याय स्वीकारत असल्याचे चित्र आहे. गाय-म्हशींच्या तुलनेत मेंढ्यांचे संगोपन काही परिस्थितींमध्ये कमी खर्चात करता येते. माळरानावर चरण्याची उपलब्धता, समूहाने पालन करण्याची पद्धत आणि मांस तसेच लोकर यांमधून मिळणारे उत्पन्न यामुळे मेंढीपालनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे विभागाची स्थिती

पुणे विभागात गोवंश आणि मेंढ्यांची संख्या स्थिर असून म्हैस २१.७०% आणि शेळी २५.८% ने घटली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गोवंशात ७.२०% वाढ तर पुणे जिल्ह्यात गोवंशात ५.००% घट झाली आहे. तर पुणे विभागातील सर्वच सर्व जिल्ह्यात १२.८०% ते २७.३०% घट झाली आहे. शेळींच्या संख्येत कोल्हापूरमध्ये ५.७०% वाढ तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३३.६०% घट झाली आहे. मेंढींच्या संख्येत पुणे जिल्ह्यात ८.००% घट तर कोल्हापूरमध्ये ८.३०% वाढ नोंदली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news