Maharashtra Teachers Recruitment : राज्‍यात ४ हजार शिक्षक नियुक्‍तीच्‍या प्रतीक्षेत

पात्र उमेदवार नियुक्‍ती द्या : युवा शैक्षणिक, सामाजिक न्याय संघटनेची मागणी
Teacher
Teacherpudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सन २०२५ मधील शिक्षक भरतीतील चार हजार ३०० शिक्षक नियुक्‍ती आदेशाच्‍या प्रतीक्षेत आहेत. निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेऊन त्‍यांना तात्‍काळ नियुक्‍ती देण्याची मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्‍याय संघटनेकडून होत आहे.

सध्या राज्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही काही उमेदवारांचे नियुक्ती आदेश रखडले आहे. मात्र, आचारसंहितेचा सन्मान राखून त्‍यावर तोडगा काढून नियुक्‍ती आदेश देण्यात मागणी शिक्षकांतून होत आहे.

ज्या उमेदवारांची नियुक्तीपूर्व सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे, त्यांच्या नियुक्तीबाबत आचारसंहितेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी किंवा स्पष्ट मार्गदर्शन घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) आणि शालेय शिक्षण विभागाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

अध्यापनावर परिणाम

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी निर्णय आवश्यक आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अध्यापनावर परिणाम होत आहे. ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यास शाळांना वेळेत शिक्षक मिळतील आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला मोठा दिलासा मिळणार आहे.

उमेदवारांनी भरतीचे सर्व कठीण टप्पे पार केले. त्यामुळे त्यांच्या मनातील अनिश्चितता दूर करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग न होता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली शासनाने पुढाकार घेऊन शिक्षकांना नियुक्‍ती आदेश तत्‍काळ द्यावा.
- संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news