

सोलापूर : गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील 252 गावे क्षयरोग (टीबी) मुक्त झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील 53 गावांना सिल्व्हर पदकाने तर 176 गावांना ब्राँझ पदकाने सन्मामित करण्यात आले आहे. टीबी मुक्त अभियान सुरू झाल्यापासून गत दोन वर्षात 252 ग्रामपंचायती ह्या टीबी मुक्त झालेल्या आहेत. टीबी मुक्त गावांमध्ये पुन्हा संशयित रुग्ण आढळूच नये यासाठी काळजी घेण्यात येते.
जिल्ह्यात 1025 गावांची संख्या आहे. केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी टीबी मुक्त ग्रामपंचायत व गाव अभियान सुरू केली. हे अभियान जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी कार्यालयाकडून राबवली जाते. जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र यासह अन्य आरोग्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबवते. संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने संकलित करणे. वा, त्याची तपासणी झाल्यानंतर त्याचे रिपोर्ट संबंधित संशयित रुग्णापर्यंत पोहोचणे आदी प्रक्रिया ही याच सस्थांच्या माध्यमातून राबवली जाते. जिल्ह्यातील विविध गावातील संशयितांची थुंकीची नमुने घेण्याची प्रक्रिया ही अखंड चालूच असते.
मात्र, टीबीमुक्त अभियान हे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या दोन वर्षात 252 ग्रामपंचायती ह्या टीबी मुक्त करता आलेले आहेत. म्हणूनच, अशा ग्रामपंचायतींचे ब्राँझ व सिल्व्हर पदकाने गौरव केला आहे. अशा गावात पुन्हा असे संशयित रुग्ण आढणार नाही. याचीही काळजी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. तसेच, जे कर्मचारी यासाठी योगदान देतात. त्यांचाही कौतुक यादरम्यान केला जातो.