Maha Shivaratri: कोर्टीच्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव

शंभू महादेव यात्रा कमिटीकडून तयारी; पंढरपूर शहरापासून जवळ असल्याने भाविकांची पसंती
Maha Shivaratri: कोर्टीच्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर-कराड रोडवर पंढरपूर शहरापासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या कोर्टी (ता.पंढरपूर) येथील ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या कोर्टी येथील शंभू महादेव मंदिरात अर्थात कोर्टेश्वर महादेव मंदिरात रविवार, दि. 15 फेब्रुवारी महाशिवरात्री साजरी होत आहे. या उत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. या यात्रा महोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्यानिमित्ताने शंभू महादेवाच्या मंदिर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. महाशिवरात्री दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

मंदिरात पहाटे 5.30 वाजता नित्य पूजा व सकाळी 7 वाजता आरती होते. कोर्टी येथील मंदिरात तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील रथोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरात यात्रा भरली जाते. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र कोर्टी शंभू महादेव मंदिर भाविकांचे व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाशिवरात्र यात्रा महोत्सवासाठी शंभु महादेव मंदिर ट्रस्ट सज्ज झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात व मंदिरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच चोख पोलिस बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.

भाविकांना शुद्ध पाणी व फराळाची विशेष व्यवस्था कमिटीकडून ठेवण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या रात्री महापूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महत्त्वपूर्ण कार्यक्रम रात्री दहा वाजता असून मुख्य मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. काल्याचे कीर्तन, महाप्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे.

येथे चैत्र शुद्ध एकादशीला कोर्टेश्वराची यात्रा असते. श्रावणात येथे मोठा उत्सव असतो. प्रत्येक श्रावणी सोमवारी दिवसभर आजूबाजूच्या परिसरातून लोक दर्शनास येथे येत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कोर्टी येथे भाविकांची भरपूर वर्दळ असते. असे मंदिराचे पुजारी अनिल गुरव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news