Madha crime: माढ्यात मारहाणीत एकाचा खून; परप्रांतीयास अटक

दारू पिण्यावरून झालेल्या मारहाणीत मृत्यू; पाच दिवसांची पोलिस कोठडी
Madha crime |
Madha crime: माढ्यात मारहाणीत एकाचा खून; परप्रांतीयास अटकFile Photo
Published on
Updated on

माढा : माझ्या मालकाला मी दारु पित असल्याचे का सांगतो, या कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी माढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना 18 सप्टेंबर रोजी माढा येथे शिवाजी चौकात सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

संतोष गंगाधर कदम (वय 45) रा. माढा असे मयताचे नाव आहे. तर अशानुअली शहाजानअली शेख (रा. धनोरना हायवे ता. इलीपुर जि हुगली (पश्चिमबंगाल) हल्ली मुक्काम झेंडे गल्ली माढा असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिमान शहाजी कदम याने फिर्याद दिली आहे. यातील आरोपीस पोलीसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

फिर्यादीनुसार 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास अभिमान कदम यांचे चुलते संतोष कदम यांना तु माझे मालकाला मी दारू पित असल्याचेे का सांगतो. तुला आता जिवंत ठेवत नाही, तुला जिवच मारून टाकतो असे म्हणुन शेख याने संतोष यांच्या कानाच्या मागे मारून जीवे ठार मारले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news