

सोलापूर : रेल्वे प्रशासनातील जनसंपर्क विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांचे समस्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यासमोर मांडणार असून त्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिले.
कोटा येथे देशभरातील रेल्वे प्रशासनातील जनसंपर्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे झालेल्या बैठकीत सभापती बिर्ला बोलत होते. यावेळी रेल्वेचे विभागीय प्रबंधक अनिल कालरा, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी कमल जोशी, अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रबंधक ललित कुमार धुरंधर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सौरभ जैन, विभागीय वाणिज्य प्रबंधक किशोर पटेल, विक्रमसिंग, विरोधी पक्षनेते लव शर्मा यांच्यासह रेल्वेच्या विविध संवर्गातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रारंभी सभापती बिर्ला यांचे स्वागत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अनिल कालरा यांनी केले. विभागीय प्रबंधक कालरा यांनी या विभागाच्या समस्यांची मांडणी केली. जनसंपर्क विभागाचे अधिकारी कर्मचारी हे एका टेबलवर बसून कामकाज पाहत असल्याचे वास्तवाचे कथनही त्यांनी केले.