Life Certificate: हयात प्रमाणपत्र आता लाभार्थ्यांना घरपोच

योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र बीएसए या ॲपच्या माध्यमातून सादर करणे आवश्यक
Life Certificate: हयात प्रमाणपत्र आता लाभार्थ्यांना घरपोच
Published on
Updated on

सोलापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आता बीएसए या ॲपच्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेसाठी BSA ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थ्यांना स्वतः, नातेवाईकांच्या मदतीने किंवा ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येईल. सदर सेवा लाभार्थ्यांना निःशुल्क असून, सेवा केंद्रांमार्फत घेतल्यास कमाल ५० रुपये इतके शुल्क देय राहील.

या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची वेळेची बचत होऊन हेलपाटे टळतील व विहित कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर ॲपची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलच्या सहाय्याने घरपोच पडताळणी करतील, जेणेकरून ही सुविधा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी स्वयं-सत्यापन करावे किंवा कुटुंबीयांच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार (संगायो) शिल्पा पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news