

सोलापूरः हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा मिळावा अशी मागणी शहीद भगतसिंग प्रवासी संघटनेने केली आहे. 13 डिसेंबर रोजी जेऊर येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आले होत. त्यावेळी संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांचा सन्मान आला. यावेळी मीना यांच्या हस्ते प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संघटनेतर्फे सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस गाड्यांना जेऊर येथे थांबा मिळावा. तसेच पारेवाडी वरून सकाळच्या सत्रामध्ये पारेवाडी स्थानकामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या एखाद्या एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा ही विनंती मीना यांना करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जेऊरगावचे सरपंच पृथ्वीराज पाटील, करमाळापंचायत समितीचे मा. सभापती अतुल पाटील, प्रदीप पवार शहीद भगतसिंग प्रवासी संघटना, करमाळा तालुका किरकोळ व्यापारी संघटना जेऊर व यांनी दिले. दिलेल्या निवेदनावर तात्काळ विचार करून लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी जेऊर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमृत भारत योजनेमध्ये जेऊर स्टेशनचे नाव आहे लातूर सोलापूर गुलबर्गा व जेऊर या चारच ठिकाणी मोठ्या स्क्वेअर चे एलईडी डिस्प्ले बसवण्यात आले आहेत जेऊर स्टेशनला दिलेल्या सोयीबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले.