‘लाडक्या बहिणी’मुळे थांबला निधी

चारचाकी वाहनांच्या पडताळणीस विलंब; तत्काळ पडताळणीचे आदेश
‘लाडक्या बहिणी’मुळे थांबला निधी
File Photo
Published on
Updated on

सोलापूर : लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहने आहेत का? याची पडताळणी महिला व बालकल्याण विभागाकडून होत आहे. या पडताळणीस विलंब होत असल्याने लाडक्या बहिणींचा निधी थांबला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची पडताळणी तत्काळ करावे, असे आदेश महिला बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यात सुमारे अकरा लाखांपेक्षा जास्त महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्याची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. मात्र, या पडताळणीस विलंब लागत असल्याने महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव हे सातत्याने व्हिसीद्वारे पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शासनाकडून लाडकी बहीण योजनेला विविध नियम लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्वतःहून नकार देणार्‍यांची संख्या कमीच

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अनेक बहिणी विविध कारणांमुळे अपात्र ठरणार आहेत. त्या लाभार्थ्यांची शासनाकडून चौकशी होणार आहे. मात्र, त्याआधीच स्वतःहून योजनेचा नकार देणार्‍या बहिणींची संख्या अल्प प्रमाणात असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news