Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी मिळणार ३ हजार रुपये?

सप्टेंबर-ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळणार
ladki bahin yojana
ladki bahin yojanaPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहीणींना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे प्रत्येकी १,५०० रुपये असे एकूण ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात एकत्र जमा करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून दिला जातो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाभार्थी महिलांचे लक्ष आता सप्टेंबर व ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागले आहे. दिवाळी खरेदी, किराणा आणि घरगुती खर्च वाढत असल्याने या महिलांना या निधीची प्रतीक्षा आहे. सणापूर्वी रक्कम जमा झाल्यास महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे सरकारकडून लवकरच हप्त्याच्या वितरणाबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दिला जातो. दरम्यान, ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत बदल झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महिलांनी हप्ता जमा झाल्याची माहिती अधिकृत माध्यमांतून तपासावी. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे दिवाळीपूर्वी मिळणार की स्वतंत्रपणे वितरित होणार, हे सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news