Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ ऑगस्टचा हप्ता जमा

सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांवर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जात आहे
ladki bahin yojana
ladki bahin yojanaPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांवर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जात आहे.

तांत्रिक अडचणी, ई-केवायसी प्रक्रिया तसेच आधार क्रमांकाचे बँक खात्याशी लिंकिंग आणि पडताळणी यामुळे अनुदान मिळण्यात विलंब झाला. संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची कार्यवाही वेगाने करण्यात आली आहे. २४ सप्टेंबरनंतर हप्ता वितरणासंदर्भातील आदेश आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकली असून, पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे लाभार्थींनी आपल्या बँक खात्याचे व्यवहार तपासावेत, तसेच आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची स्थिती पडताळून पाहावी. ज्या पात्र महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी संबंधित यंत्रणेकडून आपल्या अर्जाची आणि बँक खात्याची स्थिती तपासावी. हप्ता जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असल्याने सर्व लाभार्थींना एकाच वेळी रक्कम मिळेलच असे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news