सोलापूर : लच्यान-तडवळ ट्रॅक दुरुस्ती; रविवारपर्यंत गाड्या रद्द

मालगाडीचे इंजिन घसरल्याने ट्रॅक दुरुस्ती
For track repair Trains canceled till Sunday
लच्यान-तडवळ ट्रॅक दुरुस्ती; रविवारपर्यंत गाड्या रद्दFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

मागील दोन दिवसांपासून हुबळीकडे जाणार्‍या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. यात आता सोलापूर-होसपेटसह अन्य गाड्याही रद्द झाल्याने सोलापूरहून पर्यटनासाठी जाणार्‍या पर्यटक व प्रवाशांना हंपी, होसपेटला जाण्याचा बेत रद्द करावा लागणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या विजयपुरा-होटगी सेक्शनमधील लच्यान-तडवळ स्थानकादरम्यान भीमा पुलाजवळ मालगाडीचे इंजिन बुधवारी (दि. 25) मध्यरात्री दीड वाजता रुळावरून घसरले. त्या ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी या गाड्या रविवारपर्यंत रद्द केल्या आहेत.

For track repair Trains canceled till Sunday
आंध्र, तेलंगणात पावसाचा कहर; १९ मृत्यू, शाळांना सुट्टी, १४० रेल्वे गाड्या रद्द

तडवळजवळ भीमा नदीच्या शेजारून जाणार्‍या रुळावरून मालवाहतूक गाडीचे इंजिन घसरल्याने सोलापूर रेल्वे विभागातील तसेच दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातील अनेक गाड्या रद्द केल्या. हा ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. पण, दुरुस्तीसाठी आणखीन चार ते पाच दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news