

कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहराच्या विकासासाठी मी निधी आणला, अपूर्ण कामेही पुढील काळात मीच करणार असल्याचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठकरे शिवसेना जिल्हाप्रमुख त्यांनी यावेळी बोलून दाखवला .
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवाजी चौक येथे जाहीर सभा झाली. यावेळी जिल्हाप्रमुख डिकोळे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ओबीसी नेते हुजूर इनामदार, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री संतोष भिसे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, राजेंद्र पारखे, फुलचंद धोकासह सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी धनंजय डिकोळे म्हणाले की, कुर्डूवाडी शहरात आज पर्यंत कधीही निधी एवढा आला नव्हता तेवढा आम्ही आणला आहे. भुयारी गटार योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झालेे आहे, अद्याप पाच टक्के काम बाकी आहे. तेही पुढील काळात पूर्ण करून गटारातून वाहणारे पाणी पूर्णपणे बंद होईल. यामुळे शहरात डास रोगराई पसरणार नाही. पहिला टप्पा पूर्ण झाला की दुसरा टप्प्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत .
रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे, याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गल्ली बोळातील रस्ते करण्याचे काम बाकी आहे. तेही पुढील काळात करून गाव धुळमुक्त यामुळे होणार आहे. शहरा जवळून गेलेल्या ओढ्याचेे नाला सौंदरीकरण अंतर्गत आम्ही काम करून ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅक, मुलांना खेळणी, तरुणांना व्यायाम शाळा उभारणार आहे. नगरपालिकेला विजेचे बिल जास्त येते आहे. भविष्यात सोलरवरती सर्व वीज तयार करणार आहोत. शहराच्या परिसरातील भागाचा आणि हद्दवाढ अंतर्गत समावेश करून नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. उजनी धरणावरून पाणी पुरवठा योजने साठी 116 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. पुढील काळात त्याला निधी आणू यामुळे शहराला दररोज पाणी मिळेल.
यावेळी अनेक उमेदवारांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार प्रांजली सोनटक्के, विजय देवकते, मोहन लोंढे, निलोफर शेख, सरस्वती क्षीरसागर अंजली गावडे, अनिता साळवे, अजिंक्य गव्हाणे, अबोली चौधरी, इस्माईल सैय्यद, जयकुमार भिसे, पूजा बागल, विक्रम खवळे, दमयंती सोनवर, शारदा गवळी, गौरी सुसलादे, ऋषिपल वाल्मिकी, सुमैय्या आतार, श्रीनाथ गोरे सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या नगरपालिका निवडणूकीत पक्ष वाढले असलेतरी ठाकरे शिवसेनेवर पूर्वीप्रमाणेच जनतेचे प्रेम असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळेच प्रचार सभांना नागरीकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.