

सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डू येथे अवैध मुरूम उपसा प्रकरणी ग्रामसेवक, सरपंचांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ग्रामसेवकाचा निलंबनाचा प्रस्ताव असून लवकरच त्याला निलंबन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृह सीईओ जंगम यांनी गुरुवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी त्यांनी माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जहिर शेख आदी उपस्थित होते.
सीईओ जंगम म्हणाले, अवैध मुरूम उपसा प्रकरणी माढा तालुक्यातील कुर्डू येथील सरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हा झाला आहे. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच यांचा प्रस्ताव मागविले होते.
दहा ग्रामसेवकांना नोटिसा
मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी बर्याच गावातील कामे संथगतीने होत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे दहा ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस दिले आहे. तसेच पुढील पंधरा दिवसानंतर पुन्हा गावांना भेटी कामांची पाहणी करणार आहे. त्यानंतरही कामास गती न मिळाल्यास थेट कारवाई करणार असल्याची सीईओ जंगम यांनी सांगितले.