Solapur News : कोल्हापूर-सोलापूर प्रवासात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

एसटी प्रशासनाने दरपत्रक पूर्ववत करावे; अशोक कामटे संघटनेची मागणी
ST News |
कोल्हापूर-सोलापूर प्रवासात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड Pudhari Photo
Published on
Updated on

सांगोला : कोल्हापूर-सोलापूर-मंगळवेढा या प्रवासात दरपत्रक पूर्ववत करावेत. अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने एसटी प्रशासनाकडे केली आहे.

एका वर्षापासून मंगळवेढा मार्गे सोलापूरला जाणाऱ्या बसेस या सोलापुरात दमानीनगर रेल्वे पूलाच्या पुनर्बांधणी करिता बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पर्यायी विजापूर बायपास मार्गे बाळे, सोलापूर असा प्रवास करत होते. त्यामुळे प्रवाशांना ज्यादा तिकिटाचा भार सोसावा लागत होता; पण प्रवाशांनी व इतर संघटनांनी मागणी करून सोलापूर शहरातील दमानीनगर रेल्वे पुलाचे काम होईपर्यंत शहरालगत असणाऱ्या देगाव, अवंती नगर, पुना नाका मार्गे सोलापूर शहरात हा रस्ता 15 दिवसापासून वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे प्रवाशांच्या अंतर व वेळ वाचत आहे. पण इतर विभागातून येणाऱ्या एसटी कोल्हापूर, शिराळा व कोकणातून येणाऱ्या एसटी बसेस या पूर्वीप्रमाणे जादा तिकिटाचे आकारणी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. काही बसेस या मार्गाचा वापर करीत नाही. तरी सोलापूर विभागीय एसटी महामंडळ कार्यालयाने मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या येणाऱ्या बसना पूर्ववत तिकीट दर ठेवावेत. हा मार्ग वापरण्यास सक्तीचे करावे, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. तरी एसटी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर सुधारित मार्ग वापरण्यास व तिकीट कपातीस संबंधितांना तत्काळ सूचना द्याव्यात. अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news