Valsangkar Death Case : मनीषा मुसळेच्‍या दोषमुक्‍ती अर्जावर उच्‍च न्‍यायालयात १४ ला सुनावणी

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात होणार सुनावणी
Dr. Valsangkar Death Case |
डॉ.शिरीष वळसंगकर(File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : प्रसिद्ध न्‍यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या आत्‍महत्‍येतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिच्‍या दोषमुक्‍ती अर्जावर उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर खंडपीठात १४ ऑगस्‍ट रोजी सुनावणी होणार आहे.

मनीषा मुसळे माने हिचा दोष मुक्तीचा अर्ज सोलापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिने ॲड. प्रशांत नवगिरे यांच्‍या मार्फत उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर खंडपीठात दाद मागितली. उच्‍च न्‍यायालयाने १२ मे रोजी पुढील तारीख होईपर्यंत मनीषावर दोषानिश्चिती करू नये, असे आदेश जिल्‍हा न्‍यायालयाला दिले. त्‍यानंतर सदर प्रकरणी उच्‍च न्‍यायालयात १० जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती परंतु फिर्यादीस नोटीस न मिळाल्याने आता १४ ऑगस्‍ट रोजी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे.

दरम्‍यान जिल्‍हा न्‍यायालयात २० जुलै रोजी तारीख असून उच्च न्‍यायालयाचा आदेश येईपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नसल्याने ती तारीखही पुढे जाण्याची शक्‍यता आहे. सदर प्रकारणात आरोपीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर फिर्यादीतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, सरकार पक्षाच्‍या वतीने ॲड. प्रदीपसिंह रजपूत काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news