

सोलापूर : यंदा राज्य शासनाने एक रुपयातील पीक विमा योजना गुंडाळून नव्याने पीक विमा आणला असून, पीक विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आला आहे. पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती. शेवटच्या तारखेपर्यंत 1 लाख 26 हजार 984 जणांनी विमा उतरविला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांना भरपाई दिली जाते. पीक विमा भरण्यात बार्शी पुढे असून 22 हजार 985 शेतकर्यांनी अर्ज भरला आहे. पंढरपूर तालुक्यात सर्वात कमी 375 शेतकर्यांनी पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. खरीप हंगाम 2025 या वर्षातील कांदा, सोयाबीन, तूर, उडीद यासह अन्य पिकांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. 1 जुलै ते 31 जुलै खरीप हंगामासाठी पीक विमा कालावधी भरण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. 1 रुपयातील पीक विमा गुंडाळण्यात आल्याने शेतकर्यांनी पाठ फिरविली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 26 हजार 984 शेतकर्यांनी 1 लाख 83 हजार 722 हेक्टरवर पीक विमा उतरविला, यासाठी शेतकर्यांनी 14 कोटी 29 लाख 3 हजार रुपये भरले.
राज्य-केंद्राचा हिस्सा
राज्याचा 57 कोटी 80 लाख 88 हजारांचा तर केंद्र शासनाचा 54 कोटी 80 लाख 87 हजार रूपयांचा हिस्सा आहे.