

करमाळा : केम रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून त्यामूळे नागरीकांसह विद्यशार्थ्यांची सोय होणार आहे. तीन ते चार महिन्यात भुयारी मार्गाचे काम सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.
केम- ढवळस या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे असणार्या आठ गावांना असून दळणवळणासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही. अनेक गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे मार्गाच्या अलीकडील व पलीकडील गावातील लोकांना पाऊस पडल्यावर येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन सदर गावातील नागरीक तसेच शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे लाईन ओलांडावीे लागते. त्यामुळे त्याच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामूळे याठिकाणी भुयारी मार्ग बनवून द्यावे, अशी मागणी माजीआमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे आधिकारी प्रसाद जोशी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोकरे यांनी मिळून सर्वेक्षण करून प्रस्ताव रेल्वे विभागाकडे पाठविला होता. सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. सुजित मिश्रा यांच्याकडून केम- ढवळस रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाला तीन ते चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळून काम लवकर सुरु होणार आहे अशी माहिती प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी दिली आहे. रोज सकाळी दौंड व सोलापूर येथे शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थी, व कर्मचारी लोकांना येण्या जाण्यासाठी लवकरच शटल रेल्वे गाडी सुरु होईल असेही सांगण्यात आले.