सोलापूर : कासिम उर्फ सोहेल शफिक शेख दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपार

Expulsion case: पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी केली कारवाई
deported
सोलापूर : कासिम उर्फ सोहेल शफिक शेख दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपारfile photo
Published on
Updated on

सोलापूर : शहरात जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, गैर कायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या कासिम उर्फ सोहेल शफिक शेख (वय 27, रा. 92, पटेल किराणा दुकानाच्या समोर, सिद्धेश्वर पेठ) याला जिल्ह्यातून सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

दरम्यान, शेख याच्याविरुद्ध सन 2017, 2019, 2020, 2022, 2023 व 2024 या कालावधीमध्ये गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 कलम 56 (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कारवाई करून त्याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर कर्नाटक येथे त्याला सोडण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news