Solapur District Bank : माजी आ. मोहिते-पाटील, शिंदे, मानेंसह अनेक नेत्‍यांना धक्का

जिल्हा बँक : सहा अपात्र संचालकांची याचिका फेटाळली; सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक पदासंदर्भात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सहा माजी संचालकांच्‍या याचिकेवर सर्वोच्च न्‍यायालयाने हस्‍तक्षेपास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, न्यायालयाच्या या निकालामुळे माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. दिलीप माने, माजी आ. जयवंतराव जगताप, सोलापूर बाजार समितीचे सुरेश हसापुरे आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे हे जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीतून बाहेर पडले.

अर्ज कर्जवाटपातील कथित अनियमिततेच्या कारणावरून कलम ८८ अंतर्गत कारणावरून जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी या सहा माजी संचालकांचे उमेदवारी अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात पुणे विभागीय सहनिबंधक आणि उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दिलासा न मिळाल्याने, या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र हे प्रकरण सुनावणीस येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे गेली होती. त्यामुळे निवडणुकीच्या या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखेरची आशा असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सहा नेत्यांच्या दृष्टीने नकारात्मक निर्णय आल्याने दिग्गजांचा यंदाच्या निवडणुकीतून जिल्हा बँकेत पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.