

सोलापूर : शहरातील कर्णिक नगर जवळ एका व्यक्तीच्या ताब्यातून 29 ग्रॅम एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. आमीर हमजा अकलाख दिना (वय 30, रा. बेगम पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने तीन ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम एमडी ड्रग्ज विकण्याकरिता कर्णिक नगर येथील मोकळ्या मैदानात थांबला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आमीर हमजा अकलाख दिना असे नाव त्याने सांगितले. त्याच्याकडून 29 ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच इलेक्ट्रिक वजनकाटा असा 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मुस्ताक नदाफ, वहाब शेख, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, युवराज गायकवाड, इकरार जमादार, धनाजी बाबर यांनी पार पाडली.