Karmala murder case: वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराचा खून

करमाळा तालुक्यातील केम येथील घटना
Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

करमाळा : तालुक्यातील केम येथे वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगाराचा अज्ञात इसमांनी खून केल्याचा प्रकार करमाळा पोलिसांनी उघडकीस आणल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मल्हारी पोपट कांबळे (वय 38 वर्ष रा. केम ता. करमाळा जि. सोलापुर) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट बबन टिळेकर यांनी करमाळा पोलिसात अज्ञात खुनी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 12 एप्रिल रोजी रात्री साडे बारा वाजण्यापूर्वी मौजे केम येथे दत्तात्रय देवकर यांचे शेती गट नं 527 मध्ये एक मृतदेह आढळून आला होता.

यातील घटनास्थळ व मयताची परिस्थिती पाहून 17 एप्रिल रोजी मयत इसम मल्हारी पोपट कांबळे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून गळा दाबून अथवा गळा आवळून खुन केला असल्याचे करमाळा पोलिसांनी निष्पन्न केले आहे. त्यापूर्वी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशी अंती खून निष्पन्न झाल्याने अज्ञात इसमाविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्या अनुषंगाने अज्ञात इसमाच्या विरोधातगुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news