

करमाळा : कमला भवानी मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्या निमित्ताने श्री कमला भवानीला चंदन मळवट भरण्यात आला. निरनिराळे आभूषणे परिधान करण्यात आली. सोनेरी रंगाचा शालू नेसवण्यात येऊन पूजा मांडण्यात आली.
मानकरी फुलारी परिवाराकडून अर्पण करण्यात येणारी झेंडूच्या फुलाची मंडवळी परिधान करण्यात आली होती.घटावर झेंडूची फुलाची माळ चढवण्यात आली . भवानी मातेच्या हातामध्ये तलवार व त्रिशूल देण्यात आला होता.
आजची पूजा रोहित पुजारी यांनी मांडली. यानंतर आरती झाली. यावेळी श्री जगदंबा देवी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ.रोहन पाटील, सुशिल राठोड , अॅड. शिरीषकुमार लोणकर, राजेंद्र वाशिंबेकर, पुरोहित श्याम पुराणिक , जयदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, बापु पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, मानकरी, सेवेकरी, खांदेकरी, आराधी, सर्व भक्तगण, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.