सांगोला : ट्रॅव्हल्समधील प्रवाशाचे पावणे नऊ लाखांचे दागिने लंपास

नागपूर- तासगाव प्रवासादरम्यान चोरी
jewelry Theft
ट्रॅव्हल्समधून एका प्रवाशाचे दागिने चोरीला गेलेFile Photo

सांगोला : ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणार्‍या सोने चांदी व्यापार्‍याच्या पर्समधील 23 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 39 हजार रुपये असा एकूण 8 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.

jewelry Theft
Dhule Crime | मुंबई- आग्रा महामार्गावरील एसबीआयचे एटीएम फोडून चोरी

सोने चांदीचे व्यापारी बाबासाहेब नामदेव जाधव, ( रा. मायाक्का मंदिरजवळ, ता. तासगाव जि. सांगली) यांनी फिर्याद दिली. ते 9 जुलै रोजी पत्नीसह सॅनी ट्रॅव्हल्स बसने नागपूरहून तासगावला लग्न कार्यासाठी निघाले होते. सोन्याचे दागिने सोबत घेवुन प्रवास करीत होते. दुसर्‍या दिवशी सकाळी मंगळवेढा-सांगोला रोडवरील मौजे वाढेगाव येथील हॉटेल राजापुरी येथे सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबली. त्यावेळी सोन्याचे दागिने असलेली पर्स सीटवर ठेवून पती-पत्नी दोघेही खाली उतरले. पर्समधून पैसे घेणेसाठी जाधव यांची पत्नी बसमध्ये गेली असता तिला पर्समधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news