Jaykumar Gore: उजनी जल पर्यटन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी

पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
Jaykumar Gore
Jaykumar Gore
Published on
Updated on

सोलापूर : राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण सप्ताह आणि जलसंधारण अभियानात सहभागी व्हावे, उजनी जल पर्यटन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी मिळतील, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचे स्मरण करून सोलापूरच्या ऐतिहासिक “स्वतंत्र सोलापूर” परंपरेचा गौरव केला. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.०५ वाजता करण्यात आले. तत्पूर्वी वंदे मातरम, ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत व त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन झाले. त्यानंतर तंबाखू मुक्तीची तसेच जलसंधारण दिनाची शपथ देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तर राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news